Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : महायुती सुस्साट, पोहचली सत्तास्थापनेजवळ !

#image_title

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates :  महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. कलानुसार महायुती सत्ता स्थापनेजवळ गेल्याचे दिसत आहे. तर, महाविकास आघाडीकडूनही कडवी झुंज पाहायला मिळत आहे. सध्यातरी युती आणि आघाडी सत्तेत येईल, याविषयी भाष्य करणे अवघड आहे.

सुरवातीच्या कलानुसार २८८ विधानसभा मतदार संघापैकी महायुती १४८ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी १२७ जागी आघाडीवर आहे.

महायुतीत भाजप ९३, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २८ हे पक्ष सध्या एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडीत काँग्रेस ४९, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४१ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, निकालांवर अवलंबून असलेल्या या सर्व तयारीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चुरशीची झाली आहे. सायंकाळपर्यंत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा चेहरा स्पष्ट होईल.

कोणाला बहुमत मिळेल, कोणते गट एकत्र येतील, आणि सत्ता स्थापनेसाठी कोणती रणनीती अवलंबली जाईल, याबाबत राज्यातील जनतेत कमालीची उत्सुकता आहे.