महाराष्ट्रातील विधासनभा निवड़णुकीचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोग आज जाहीर करणार तारखा

मुंबई : हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधासनभा निवड़णुकीचं बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्टसह झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, दिवाळी आणि छट लक्षात घेऊनच निवडणूक आयोग तारखा निश्चित करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. तर २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. २०१९ मध्ये २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर येथे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच लढत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना युबीटी आहे. त्याचबरोबर महाआघाडीत भाजप, शिवसेनेतील शिंदे गट आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीचा गट आहे. येथे दोन्ही आघाड्या जागावाटप अंतिम करण्यात व्यस्त आहेत.