महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला पकडले

मुंबई : चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेली इंदूर येथील सर्फराज मेमन ही संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत पोहोचली असून, तो घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) ई-मेलद्वारे पाठविल्याने मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांची झोप उडाली होती. मात्र सरफराज मेमन याच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला यश आलं आहे. सरफराज याला इंदोरमधून ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा एनआयएकडून मुंबई पोलिसांना एक मेल आला होता. या मेलमध्ये सरफराज मेमन यांच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जो मेल आला आहे, त्या मेलमध्ये सरफराज हा मध्यप्रदेशमधील इंदोरचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत मध्यप्रदेश सरकारला देखील माहिती देण्यात आली होती. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे लायन्स, परवाना, व्हिसा यासह आधार कार्डची प्रतही मुंबई पोलिसांना मेल करण्यात आली होती.