Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी

नागपूर ।  महायुतीच्या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतून अनेक नवे मंत्री नियुक्त झाले आहेत.

शिवसेना 

भरत गोगावले – महाडमधून चार वेळा आमदार.
संजय शिरसाट – ओवळा-माजिवड्याचे आमदार.
प्रताप सरनाईक – ओवळा-माजिवड्याचे आमदार, २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
प्रकाश आबिटकर – राधानगरीतून शिवसेनेचा एकमेव आमदार, २०१४ मध्ये निवडून आले.

भा.ज.पा. (BJP) 

आशिष शेलार – मुंबई भाजपचे अध्यक्ष, २०१४ मध्ये वांद्रे पश्चिमचे आमदार.
नितेश राणे – कणकवलीतून आमदार, २०१४ मध्ये काँग्रेस कडून आमदार झाले.
जयकुमार गोरे – माणमधून चार वेळा आमदार.
अशोक उईके – २०१४ मध्ये विधानसभेवर निवडून गेले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले – सातारा, २००४ पासून तीन वेळा राष्ट्रवादीचे आमदार, नंतर भाजप कडून आमदार.
आकाश फुंडकर – खामगाव मतदारसंघातील तिसऱ्यांदा आमदार.

अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला
मंत्रिपदाबाबत महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. तिन्ही पक्षाचे नेते या फॉर्म्युलावर तयार झाले. काहींना अडीच अडीच वर्ष संधी देणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.