आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर; असा राहिल राज्याचा विकास दर

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प उद्या (९ मार्च) सादर होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला आहे. यामध्ये आगामी आर्थिक वर्षात विविध क्षेत्रांमधील राज्याचा विकासदर कसा राहिलं हे जाहीर करण्यात आलं आहे. तसेच राज्याचा विकास दर हा ६.८ टक्के राहिलं असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.

सर्वेक्षण अहवालानुसार, या अहवालानुसार राज्याचा विकासदर हा ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर देशाचा विकासदर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तणवण्यात आला आहे. तर कृषी आणि कृषीविषयक क्षेत्रात १०.२ टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच उद्योग क्षेत्रात ६.१ टक्के तर सेवा क्षेत्रात ६.४ टक्के वाढ होणं अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.