Maharashtra Express: कोल्हापूर व कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी गाडी आहे. १ नोव्हेंबर १९७१ रोजी ही एक्स्प्रेस सुरू झाली होती. रेल्वेच्या आधुनिकीकरणाबरोबर तब्बल ५४ वर्षांनंतर आता एलएचबी कोचेससह ही गाडी धावणार आहे.
१ जूनपासून रेल्वे मार्गावर एलएचबी कोचेसची नवी रेल्वे उपल्ब्ध झाली असून, आता प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यांतर्गत सर्वाधिक १२ जिल्ह्यांतून १३४१ किलोमीटरचा प्रवास करीत गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस धावते.
गोंदिया येथून दररोज सकाळी ८.१० वाजता तर कोल्हापूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटते. दरम्यान, तब्बल ६२ स्थानकांवरून प्रवासी घेत दररोज मार्गक्रमण करते. प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन तत्पर आहे. रेल्वे प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय रेल्वेने मार्चमध्ये घेतला होता.
याअंतर्गत गाड्यांमधील जुने रॅक आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यांमध्ये रूपांतरित केले गेले आहे. या बदलामुळे प्रवाशांना पूर्वर्वीपेक्षा अधिक आरामदायक, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.