राज्यात आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान आहे. प्रत्येक पक्ष एकाएका मतासाठी प्रयत्न करत असताना, शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील रुग्णालयात असल्याने त्यांची मतदान हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीला याचा फटका बसू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मतदानासाठी विधान भवनाकडे रवाना झाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार देखील विधान भवनात दाखल झाले आहेत.
दरम्यान, डहाणूचे माकप आमदार विनोद निकोले हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणार आहेत. ते सध्या ठाकरेंच्या आमदारांसोबत हॉटलेमध्ये आहेत.
कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता?
भाजप आणि छोट्या मित्रपक्षांचे मिळून ५ उमेदवार. तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांच्या पक्षांना प्रत्येकी २ उमेदवार तर काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट यांना देखील १ उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपने ६ वा उमेदवार दिला तर अपक्षाला पुरस्कृत केलं तर मात्र निवडणूक अटळ आहे. यासंबधीचे वृत्त समोर आले आहे.