Maharashtra MLC Election : आतापर्यंत 222 आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे. आता नुकतंच विधानपरिषदेच्या मतदानाची पहिली आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधानपरिषदेची निवडणुकीसाठी आतापर्यंत 222 आमदारांनी मतदान केले आहे. यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांचा समावेश आहे. त्यासोबतच अपक्षांनीही मतदान केले आहे.

आतापर्यंत झालेले मतदान
भाजप-100
अपक्ष-9
अजित पवार गट-39 + अपक्ष 2= 41
शिंदे गट-30
काँग्रेस-30
शरद पवार गट-12

‘हे’ उमेदवार रिंगणात
भाजपाचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे ) : भावना गवळी, कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे

काँग्रेस : डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष : जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर