Maharashtra MLC Election : महाविकास आघाडीचा गेम; महायुतीचे सर्व उमेदवार विजयी

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. पंकजा मुंडे यांना २६ मतं मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

या निवडणुकीत भाजपचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचा विजय झाला आहे. त्यामुळं हे सर्वजण आता आमदार बनले आहेत.

याप्रसंगी ज्या पाच युवकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं नसतं तर बरं झालं असतं असं त्यांनी म्हटलं. यावेळी प्रितम मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.