---Advertisement---
जळगाव : शहरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा रेल्वे स्टेशन परिसरात कार्यान्वित झाला. यानिमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरातील वीस रिक्षांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ओळखपत्रीय स्टिकर लावण्यात आले. या उपक्रमामुळे प्रवाशांना शिस्तबद्ध व सुसंगत रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर तसेच जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रिक्षांना स्टिकर लावून वाहतूक सेनेचा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा शहरातील हा पहिलाच उपक्रम असून याला रिक्षाचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सुरक्षा जिल्हा संघटक रज्जाक सय्यद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी महेंद्र सपकाळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, सतीश सैंदाने, संजय मोती, साजन पाटील, विकास पाथरे, भुसावळ तालुका वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक सोनवणे, विशाल जाधव, हारून शेख, अरुण पटेल, अन्नू बिस्ती, रौफ खाटिक, महेंद्र सपकाळे, विजय कोळी, एकनाथ काळे, राजेश कोळी, भीमराव जगताप, रामचंद्र चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मोसिन शेख, किरण पाटील, अतुल साळुंखे, अनिल राठोड, विनोद रायपूर, शांताराम वाघ, जीवन बारी, राहुल पाटील, हेमंत पाटील, अभिजित जाधव, कुणाल महाजन, नितीन जाधव, सतीश पाखरे, राजेश शेळके, विशाल कुमावत, राहुल चव्हाण आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून पुढील काळात शहरातील विविध भागात असे रिक्षा थांबे सुरू करण्याचा मानस नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी आवाहन करण्यात आले की, रिक्षाचालक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक तसेच मिनी बस चालकांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सभासद व्हावे. इच्छुकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.