आज कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

तरुण भारत लाईव्ह न्यूज : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच काही भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्याआहेत. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यातील नागरिकांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजचा पावसाचा अंदाज

राज्यात सध्या पावसाची जोरदार बँटिंग सुरु आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडं उत्तर महराष्ट्र व विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.