हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात काहीशी वाढ दिसून आली असली तरी पुढील 24 तासांमध्ये या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळे थंडी पुन्हा राज्यात चांगलीच जाणवण्याचा अंदाज आहे. मात्र, तापमानातील चढ-उतार हे कायम असतील.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ
पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे. शुक्रवारनंतर तापमानवाढ होऊन उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवेल.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण
या भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमानात 2-3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातही गारठ्याचं वातावरण कायम असून, किमान तापमानात घट दिसून येईल.
मुंबई, पुणे, औरंगाबाद
मुंबईसह उपनगरांमध्ये किमान तापमान 14-17 अंश सेल्सिअस दरम्यान आहे, तर कमाल तापमान सरासरी 34 अंश सेल्सिअस आहे.
तापमानातील बदलांचे प्रमुख कारण
पंजाब आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्याचा प्रभाव राजस्थान आणि मध्य भारतावर दिसून येत आहे. वायव्य भारतातून 150 नॉट्स वेगाने वाहणारे जोरदार वारे राज्यातील तापमानात चढ-उतार घडवून आणत आहेत.
देशपातळीवरील स्थिती
उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश येथील पर्वतीय भागांमध्ये तापमान लक्षणीय घटले आहे. बर्फवृष्टीमुळे मैदानी भागांमध्ये थंडीचा मारा अधिक तीव्र झाला आहे.