---Advertisement---

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगांव जिल्हा नूतन कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीच्या वतीने रविवार २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता नवनियुक्त कार्यकारिणीच्या सत्कार सोहळ्याचे आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक योगशिक्षक, पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते. सुरुवातीला ओंकार आणि महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

महासचिव पांडुरंग सोनार यांनी मागील बैठकीचा अहवाल तसेच प्रोसिडिंग बुकमधील नोंदी वाचून दाखवल्या. कोषाध्यक्ष नूतन जोशी यांनी आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा सादर केला. यानंतर मागील वर्षभर कार्यरत असलेल्या मावळत्या कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

या नवीन सदस्यांचा झाला सत्कार

चित्रा महाजन – जिल्हाध्यक्ष, डॉ.शरयू विसपुते – उपाध्यक्ष, पांडुरंग सोनार – महासचिव, नूतन जोशी – कोषाध्यक्ष सोनाली पाटील – सचिव, अर्चना गुरव – सचिव, वैशाली भारंबे – सहसचिव, प्रिया दारा – संघटन सचिव, जितेंद्र कोतवाल – मिडीया प्रभारी, रोहन चौधरी – सोशल मिडीया प्रभारी, कविता चोपडे – कार्यालय सचिव, ॲड.स्वाती निकम – महिला प्रकोष्ठ प्रभारी

या प्रसंगी नव्याने महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुख्य कार्यकारिणीत नियुक्त झालेल्या प्रा. कृणाल महाजन, सुनील गुरव, प्रा. डॉ. देवानंद सोनार, अरविंद सापकर आणि चित्रा महाजन यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनात्मक कार्य, योग शिक्षणाचा प्रसार व भविष्यातील योजना यावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम अत्यंत सकारात्मक, प्रेरणादायी आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने सर्वांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अर्चना गुरव यांनी अत्यंत सुबकपणे आणि उत्साही पद्धतीने केले. त्यांचे विशेष अभिनंदन उपस्थितांनी केले. शेवटी जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांनी फोटोसेशनमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांनी एकत्रितपणे स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment