महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षणासाठी सज्ज

---Advertisement---

 

भुसावळ : तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगाव येथील ४४ एन.सी.सी. कॅडेट्स (१९ मुली आणि २५ मुले) भुसावळ येथील सैनिकी मुख्यालयात होणाऱ्या दहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले आहेत. १७ ते २६ सप्टेंबर दरम्यान हे प्रशिक्षण होणार असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा यामागील उद्देश आहे.

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध कवायत, मॅप रीडिंग, प्रत्यक्ष फायरिंगचा अनुभव, योगाभ्यास, तसेच खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होणार आहे.

विद्यालयाचे एन.सी.सी.अधिकारी सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सनी तयारी केली असून,शाळेच्या व्यवस्थापनाने या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.

या शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुणांची जाणीव होणार असल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील यांनी व्यक्त केले.कॅडेट्सना प्राचार्य सी.जे.तायडे, पर्यवेक्षक डी.आर.कोळंबे,तसेच उपशिक्षक सुनील वानखेडे,एल.व्ही.नेमाडे आणि एच. एस.पाटील यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---