मोठी बातमी ! महायुतीची बैठक पुढे ढकलली, शिंदे जाणार ‘गावी’

#image_title

Mahayuti Meeting Postponed : मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा चालली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १२ वाजता संपली. या बैठकीला शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने “भूतो न भविष्यती” अशी कामगिरी करून दाखवली. महायुतीचे वारू उधळले. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. महाविकास आघाडीचा 50 जागांच्या आत खेळ आटोपला. तर महायुतीने 230 हून अधिकचा मॅजिक फिगर गाठला. त्यात भाजपाला 132 जागांवर यश आले. भाजपा मोठा भाऊ ठरला. त्यानंतर शिंदे सेनेला 57, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्सही एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत संपून टाकला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा चालली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १२ वाजता संपली. या बैठकीला शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आता कधी होणार बैठक ?
अमित शाह यांनी दिलेल्या विविध सूचनानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे जाणार ‘गावी’
महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.