वेध
– चंद्रकांत लोहाणा
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, हे वास्तव आहे. कुणीही अमान्य करू शकत नाही. जगात सर्वाधिक हिंदू भारतातच राहतात. असे असताना बहुसंख्य हिंदूंना आपल्याच देशात स्वत:च्या न्याय्य हकांसाठी लढा द्यावा लागतो. अल्पसंख्य समुदायाकडून होणारा त्रास सहन करावा लागतो. याचा आज उल्लेख करण्याचे कारण काय? आहे म्हणूनच तर लिहावे लागते आहे. 30 मार्चला रामनवमी झाली. देशातल्या अनेक भागांत रामनवमीच्या मिरवणुकांवर कथित अल्पसंख्यक समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली. दंगल माजविण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्या घरांवरही दगडफेक झाली. त्यांची वाहनं जाळण्यात आली. देशात अशांतता निर्माण करण्याचा आणि बहुसंख्य हिंदूंना घाबरविण्याचा प्रयत्न झाला. केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असतानाही हा दुर्दैवी प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर काही कडक कृती केली तर त्यांचे विरोधक लागलीच त्यांच्यावर तुटून पडतात. सगळा दोष मोदी सरकारलाच देतात. एवढेच काय, तर राहुल गांधींसारखे लोक विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे संयम बाळगून आहेत. हिंदू बहुसंख्य असतानाही हिंदूंनाच लक्ष्य केले जाण्यामागे कारणेही आहेत. आपलेच हिंदू नेते अल्पसंख्यक समुदायाच्या दाढ्या कुरवाळण्याचे पाप करीत आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार, लालू यादव, उत्तरप्रदेशात मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्रात काँग्रेसचे अनेक हिंदू नेते, तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव, महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखे देशभरात जे विरोधी पक्षांचे नेते आहेत, त्यांनी मतपेटीसाठी कायम लांगूलचालनाची नीती अवलंबली आहे. त्याचा फटका या देशातील बहुसंख्य हिंदूंना बसतो आहे.
आज जे स्वत:ला अल्पसंख्यक समजताहेत, ते प्रत्यक्षात मोठ्या संख्येत आहेत. जगातल्या कट्टरवादी देशात नसतील एवढे सुखी, आनंदी आणि समृद्ध अल्पसंख्यक आज आपल्या भारतात आहेत. त्यांना भारताचे इस्लामीकरण करायचे आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट दिसत असतानाही आपले Hindu हिंदू नेते सुधारणार नसतील आणि सातत्याने दाढ्या कुरवाळण्याचेच उद्योग करणार असतील तर उद्या हेच अल्पसंख्यक लालू, नितीश, शरद पवार यांच्यासारख्या हिंदू नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचेही धर्मांतरण करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, हे आजच अधोरेखित करून ठेवले पाहिजे. निझामाच्या राजवटीत रझाकारांनी हिंदूंचा केलेला अतोनात छळ फार जुना नाही. छळ सहन करणार्यांमधले अनेक जण आजही हयात आहेत. असे असतानाही आपले डोळे उघडणार नसतील तर ईश्वरही आपल्याला सुरक्षित ठेवू शकणार नाही. आपल्या शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेश आहे. या दोन्ही देशांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. काही वर्षांनी तर पाकिस्तानात हिंदू औषधालाही सापडणार नाहीत. या दोन्ही शेजारी देशांमध्ये हिंदूंना दुय्यम वागणूक दिली जाते. हिंदू मंदिरे तोडली जातात. हिंदू मुली आणि महिलांचे जबरदस्ती धर्मांतरण केले जाते. तिथल्या अल्पसंख्य हिंदूंनी बहुसंख्य मुस्लिमांच्या सणवारी दगडफेक, जाळपोळ केल्याचे एकतरी उदाहरण दाखविता येईल? अजिबात नाही.
मग भारतातल्या अल्पसंख्यकांचे लाड करण्याचे कारण काय? कुठे आहेत भारतातले स्वयंघोषित पुरोगामी? वाळूत चोच खुपसून बसलेत की काय? भारतात ज्या घटना घडतात, त्याविरुद्ध एक अक्षर ही मंडळी काढत नाहीत. याउलट, एखाद्या हिंदूकडून अनवधानाने काही चूक झाली तर त्याचे खापर स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून मोदी, भाजपा आणि संघावर फोडले जाते. बादरायण संबंध जोडून भाजपाला, संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. रणमैदानावर भाजपाशी लढू शकत नसल्याचे खात्री झाल्याने छुपे युद्ध पुकारून भाजपा आणि मोदींना पराभूत करण्याचे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. ममता बॅनर्जी ज्याप्रकारे वागत आहेत, असे वाटते की, त्यांचा जन्म Hindu हिंदूंवर अत्याचार करणार्या अल्पसंख्य समुदायाचे संरक्षण करण्यासाठीच झाला आहे. विशेषत: बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना संरक्षण देताना त्या आपल्याच हिंदू बांधवांवर अन्याय करीत आहेत. हे असेच सुरू राहिले तर आपल्या देशावर भविष्यात जे संकट येणार आहे, त्यापासून आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही.
– 9881717856