---Advertisement---
जळगाव : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘वारसा’ या छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप नुकताच पार पडला. या प्रदर्शनाला भेट दिलेल्या प्रेक्षकांच्या पसंती पुरस्कार अर्थात पीपल्स चॉईस अवॉर्डचे वृत्तपत्र छायाचित्रकार गटात आबा मकासरे तर हौशी फोटोग्राफर गटात शिवम हुजूरबाजार विजेते ठरले.
प्रदर्शनास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी तसेच नव्या पिढीला संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी रोटरीचे हे ‘वारसा फोटो प्रदर्शन आणि स्पर्धा’ अत्यंत उपयुक्त आहे असे मत व्यक्त केला. यावेळी रोटरीचे पब्लिक इमेज कमिटी चेअरमन व प्रोजेक्ट चेअरमन राजेश यावलकर, छायाचित्रकार प्रकाश जगताप, पत्रकार शिवलाल बारी, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक गिरीश डेरे यांची उपस्थिती होती.
रोटरीच्या डिस्ट्रिक्ट अवॉर्ड सेलिब्रेशन कार्यक्रमात माजी अध्यक्ष डॉ. सतीश शिंदाडकर, डॉ. जयंत जहागिरदार आणि जितेंद्र ढाके यांच्या हस्ते वृत्तपत्र छायाचित्रकार आबा मकासरे यांना तर हौशी गटातील शिवम हुजूरबाजार याला माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार यांचीही उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी १९० छायाचित्रे स्पर्धकांनी पाठवली होती. त्यातील ७० निवडक छायाचित्रांचे पंधरा दिवस प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. परीक्षकांनी घोषित केलेल्या दोन्ही गटातील सहा विजेत्यांना रोख पारितोषिकांसह स्मृतिचिन्हाने गौरविण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, संवाद सचिव पंकज व्यवहारे, मावळते अध्यक्ष ॲड. सागर चित्रे व मानद सचिव पराग अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.