या सोप्प्या पद्धतीने बनवा खारी शंकरपाळी

तरुण भारत लाईव्ह । २० मार्च २०२३। आपल्याला चहा आणि कॉफी सोबत काहीतरी खायला लागतच. बिस्किट्स किंवा खारी किंवा टोस्ट हे पदार्थ आपण नेहमी खातो. पण तूम्ही कधी खारी शंकरपाळी हा पदार्थ ट्राय केला आहे का? खारी शंकरपाळी तुम्ही चहा आणि कॉफि सोबत सुद्धा पाहू शकतात. खारी शंकरपाळी गव्हाचे पीठ किंवा अन्य कोणत्याही पिठापासून तयार केली जाते. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातुन.

साहित्य 
200 ग्रॅम पीठ, 11/2 चमचे मीठ, 3 चमचे शेंगदाणा तेल, 11/2 चमचे कॅरम सीड, 1/2 कप पाणी.

कृती 
सर्वप्रथम मोठ्या बाउलमध्ये २०० ग्रॅम मैदा घ्या. यानंतर दीड चमचा ओवा घ्या आणि हातांनी कुस्करून मैदामध्ये मिक्स करा. पिठात चवीनुसार मीठ घाला आणि सर्व सामग्री नीट एकजीव करा. यानंतर मिश्रणामध्ये थोडं-थोडं तेल मिक्स करा. यानंतर मैद्यामध्ये कोमट पाणी ओता आणि पीठ मळून घ्या. मैद्याचे पीठ जास्त मऊ होणार नाही, याची काळजी घ्या. स्वच्छ कापडाच्या मदतीने १० – १५ मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा. मळलेल्या पिठाचे तीन भाग करा. यानंतर लाटण्याला थोडेसे तेल लावून शंकरपाळीच्या पिठाची पोळी लाटून घ्या. फिरकीने शंकरपाळ्या पाडून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर ओव्याच्या शंकरपाळ्या तळून घ्या. चॉकलेटी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या फ्राय करत राहा. कुरकुरीत आणि गरमागरम शंकरपाळ्या तयार आहेत.