पौष्टिक बाजरीची खिचडी घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह । २२ जानेवारी २०२३ । रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असते. रात्रीच्या वेळी हलकं आणि आरोग्यासाठी पौष्टिक असे जेवण करावे. तांदुळाची खिचडी आपण नेहमीच खातो. पण तुम्ही बाजरीची खिचडी घरी तयार करून खाऊ शकता. बाजरी हि हलकी आणि पौष्टिक असते. चला तर मग बाजरीची खिचडी कशी बनवावी हे जाणून घेऊयात तरुण भारत च्या माध्यमातून.

साहित्य 

मुगाची डाळ, लसूण, बाजरी, हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, हिंग, कढीपत्ता

कृती 

सर्वप्रथम बाजरीची खिचडी बनवण्यासाठी बाजरी थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर बाजरी पाण्यातून काढून एका स्वछ कापडावर ठेवा आणि थोडावेळ बाजरी वाळवून घ्यावी. बाजरी वाळल्यानंतर ती मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. आता कुकर मध्ये तेल टाकून हिरव्या मिरच्या, लसूण, हिंग टाकून फोडणी करावी यानंतर मिक्सरमधून काढलेला बाजरीचा भरडा एक वाटी असेल तर साधारण दाेन वाट्या पाणी कुकरमध्ये टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे आणि पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये बाजरीचा भरडा घालावा. नंतर कुकरचे झाकण बंद करावे  आणि मध्यम आचेवर एक शिटी होऊ द्यावी.

आवश्यकतेनुसार आपण खिचडीला वरून लसणाची फोडणी घालू शकता. लसणाच्या फोडणीसाठी तेलामध्ये लाल तिखट, हिंग आणि लसूणच्या ३ ते ४ पाकळ्या घालाव्या आणि गरमागरम खिचडी वर फोडणी घालून खिचडी सर्व्ह करावी.