Malegaon Fire:  मालेगावात भीषण आग; 25 हून अधिक घरे जळून खाक, गरिबांच्या संसाराची झाली राखरांगोळी

Malegaon Fire : मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी संध्यकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात एका घराला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास २५ पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत.

आग नेमकी कशी लागली?
छोटी वस्ती आणि लाकडांची घरे असल्याने एका घराला लागलेली आग काही सेकंदात सर्वत्र पसरली. अवघ्या काही मिनिटात आग सर्वदूर पसरली. मालेगाव महापालिकेच्या आग्निशामक पथकाच्या जवांनानी ११ फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली. यात अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असले आहेत. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.