ममता कुलकर्णी यांचं महामंडलेश्वर पद काढून घेतलं, काय आहे कारण?

Actress Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर अखाड्याद्वारे महामंडलेश्वर बनवलं गेलं होतं. मात्र, यावर मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर अखेर त्यांचं महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं आहे.

महाकुंभदरम्यान किन्नर अखाड्याद्वारे ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यात आलं होतं. मात्र, या निर्णयाला संत समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. यामुळे अखेर त्यांचं महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं आहे.

तसेच अखाड्याच्या आचार्या महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही पदावरून हटवलं आहे. त्यांच्यावर आणखी काही कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अजय दास ?

अजय दास यांच्या मते, ज्या धर्म प्रचार-प्रसार आणि धार्मिक कर्मकांडासह किन्नर समाजाच्या विकासाठी लक्ष्मीची नियुक्ती करण्यात आली होती, त्यावरुन त्या भरटकल्या आहेत. लक्ष्मी यांनी सनातन धर्म आणि देशहित सोडून देशद्रोहाच्या खटल्यात अडकलेल्या आणि ग्लॅमर जगताशी संबंधित असलेल्या ममताला कोणत्याही धार्मिक किंवा अखाडा परंपरेचे पालन न करता थेट महामंडलेश्वर ही पदवी दिली.

ममता कुलकर्णीचा बॉलिवूड प्रवास

1990 च्या दशकात ममता कुलकर्णी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी करण अर्जुन, क्रांतीवीर, सबसे बडा खिलाडी, चाइना गेट यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2002 मध्ये आलेल्या कभी तू कभी हम या चित्रपटानंतर त्या सिनेसृष्टीतून गायब झाल्या होत्या.