मकर संक्रांतीला नर्मदा नदीवर भाविकांची मांदियाळी

धडगाव : मकर संक्रांतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव नर्मदा मातेचे पूजन आणि स्नान  करण्यासाठी दाखल होतात. सालाबादाप्रमाणे यंदा देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी धडगाव पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

याच दिवशी नर्मदा नदीत क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी बसल्याने बोट पाण्यात उलटून सात भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना १५ जानेवारी २०१९ रोजी घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना करत पोलीस बंदोबस्त तैनात केला. शिवाय बोट ॲम्बुलन्स, आरोग्य पथकासह एक रुग्णवाहिका नर्मदा नदीच्या काटावर तैनात करण्यात आली होती. विशेषतः यंदा कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने धडगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोट
मकर संक्रांतीला नर्मदा नदीवर स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव हजेरी लावतात. ही गर्दी लक्षात घेत पोलीस प्रशासनाने यावेळी एक दिवस अगोदर गावकऱ्यांची बैठक घेत नियोजन केल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडलेला नाही – आय. एस. पठाण ,पोलीस निरीक्षक धडगाव