चोरट्यांचा धुमाकूळ ; पतीसमोर लांबविले महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र

---Advertisement---

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच पुन्हा शुसावळ मध्ये शतपावली करत असलेल्या महिलेला दोन भामट्यांनी मोटारसायकलवरून धक्का देत धूम स्टाईलने गळ्यातील ५२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील रिंगरोडवर शतपावली करत असलेल्या महिलेला दोन भामट्यांनी मोटारसायकलवरून धक्का देत धूम स्टाईलने गळ्यातील ५२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली.

प्रभाकर हॉल मागील परिसरातील रहिवासी वंदना किशोर कांबळे ह्या सोमवारी रात्री १०.३० वाजता पती व बहिणीसोबत जेवणानंतर रिंगरोडवर फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी पाटील हाइट समोरच्या रस्त्यावर, मागून भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलवर दोन अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र झडप घालून लांबविले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

चोरी क्षणार्धात घडल्यामुळे आरडाओरड करूनही चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---