Natural Mango Tips : सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, वर्षातून एकदाच येणारा हा फळांचा राजा प्रत्येकालास खायला आवडतो. मात्र, हेच आंबे खाल्ल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. याच कारण म्हणजे केमिकलयुक्त (Natural Mango Tips) आंबे खरेदी करणे होय. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी केमिकलयुक्त आंबे खरेदी करण्यापासून स्वतःला कसे बचाव कराल? यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. कोणत्या आहेत ‘या’ टिप्स चला जाणून घेऊया.
आंब्याचा हंगाम सुरु असल्याने ‘आंबे’ खाणे हे साहजिकच आहे. पण अनेकदा आंबे खाण्याच्या उत्साहात आपण केमिकलयुक्त आहे की नैसर्गिक हे बघतच नाही. बरेच व्यापारी भरघोस नफा मिळविण्यासाठी रसायने आणि कार्बाइड्स वापरून आंबे पिकवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परिणामी आपण केमिकलयुक्त आंबे खरेदी केले व खाल्ले तर ते शरीराच्या मज्जासंस्थेपर्यंत पोहोचते आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे आंबे खरेदी करण्याच्या काही टिप्स जाणून घेणे महत्वाचे आहे.
नैसर्किग आंबे
नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्याची वेगळी पद्धत असते. यासाठी झाडावरून आंबा तोडून तो उबदार ठिकाणी पेंढ्यामध्ये झाकून ठेवला जातो. मात्र हल्ली केमिकलचा वापर करून आंबे पिकवले जातात. म्हणजेच त्यात कार्बन मोनॉक्साईड, अॅसिटिलीन, कार्बाइड यांचा वापर केला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
केमिकलयुक्त आंबे खाल्यास मज्जासंस्थेचे नुकसान होते. यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते. याशिवाय कर्करोगासारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात. त्यात त्वचेचा कर्करोग, कोलन कर्करोग, मज्जासंस्था, मेंदूचे नुकसान, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांचा समावेश होतो.
केमिकलयुक्त आंबे कसे ओळखाल?
केमिकल वापरून पिकवलेले आंबे ओळखणे फारसे अवघड नाही. हे आंबे काही ठिकाणी पिवळे तर काही ठिकाणी हिरवे दिसतात. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर हिरवे डाग दिसत नाहीत. त्यामुळे ज्या फळांवर हिरवे डाग दिसतात त्या फळांपासून दूर राहा.
केमिकलने पिकवलेले आंबे कापल्यावर ते आतून कुठे पिवळे तर कुठे पांढरे दिसतात. तर नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे आतून पूर्णपणे पिवळे दिसतात. रसायनयुक्त फळे खाल्ल्याने तोंडाला तुरट चव येते आणि तोंडात थोडी जळजळ होते. त्यामुळे आंबे विकत घेताना आणि खाताना तुम्ही या सर्वच गोष्टींची काळजी नक्की घ्या.