गौतम गंभीरला पत्रकार परिषदेपासून दूर ठेवा, मांजरेकरांचे वादग्रस्त वक्तव्य

#image_title

भारतीय क्रिकेट संघाची आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी लागणार आहे. भारताला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका २२ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.

सोमवारी भारताच्या दुसऱ्या तुकडीसह रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक मुद्यांवर प्रश्न विचारण्यात आले, ज्याची उत्तरं त्याने स्पष्टपणे दिली आहेत. मात्र गौतम गंभीरच्या या पत्रकार परिषदेनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे.

काय म्हणाले संजय मांजरेकर ?
पत्रकार परिषद घेतल्यानंतर संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित केले. मांजरेकर यांनी ट्विट करून लिहिले, ‘गौतम गंभीरची पत्रकार परिषद पाहिली. गौतम गंभीरला अशा कर्तव्यापासून दूर ठेवणे हा बीसीसीआयसाठी शहाणपणाचा निर्णय असेल. त्यांना पडद्यामागेच काम करू द्या. त्याच्याकडे (गंभीर) ना त्यांच्याशी बोलण्यासाठी योग्य शब्द आहेत ना योग्य शिष्टाचार. रोहित आणि आगरकर यांनी माध्यमांशी बोलणे योग्य आहे.

गौतम गंभीर निशाण्यावर
संजय मांजरेकर यांनी ज्या प्रकारे गौतम गंभीरवर खुलेपणाने प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावरून वाद होणार हे निश्चित दिसते. मांजरेकर अनेकदा सोशल मीडियावर असं बोलतात. याआधीही त्यांनी रवींद्र जडेजाबाबत वादग्रस्त विधाने केली होती. आता त्याने गौतम गंभीरवर टीका केली आहे.

Assembly Election 2024 2