Manoj jarange : मनोज जरांगेंचे उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण 

Manoj jarange  : सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने  उद्यापासून १० फेब्रुवारी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले . सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही म्हणून आपण आमरण उपोषण करतोय असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

या उपोषणाआधी अंतरवाली सराटी  येथे मराठा समाजाची बैठक होईल. त्यानंतर १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरूवात होईल. या वेळच्या आमरण उपोषषणात आपण औषधोपचार, पाणी घेणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बीड, श्रीगोंदा भागाचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.