मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेला महाराष्ट्राचा दौरा नुकताच संपला आहे. त्यानंतर बीडमध्ये भव्य सभा घेत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा जरांगे यांनी केली. मात्र, मागील काही दिवसांपासून सतत सभांसाठी करत असलेल्या दौऱ्यामुळे जरांगे आजारी पडले आहे. त्यामुळे, बीडची सभा झाल्यावर आज मनोज जरांगे थेट छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत. यावेळी डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे.