मुंबई : मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. मात्र हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते आजपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आजपासून (15 नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
मनोज जरांगेंची आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथे सभा पार पडणार आहे. तब्बल 125 एकर शेतामध्ये या सभेची तयारी करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसा असेल दौरा?
१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा
१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी
१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड
१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड
१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी
२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण
२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,
२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर
२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.