Manoj Jarange Patil : सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष्ा निवडणूकपूर्व तयारींना लागले आहेत. अशातच मराठा आरक्ष्ाणासाठी मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगीतले.
निवडणुक लढवणं हा आपला मार्ग नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हाच आपला, माझा उद्देश आहे. राजकारण म्हटलं की, फोडाफोडीच आलीच, त्यामुळे आपलं समाजकारण सुरू ठेवायचं आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून जालना येथील आंतरवली सराटी येथून मोर्चाला सुरुवात केली असून शुक्रवारी (२६ जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे.