Manu Baker : मनू भाकरला कांस्यपदक जिंकताना पाहू शकले नाही आई-वडिल, काय आहे कारण ?

Manu Baker : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनु भाकरला पदार्पणात पदक जिंकता आले नव्हते… त्या अपयशाने ती खचली होती, परंतु प्रशिक्षक जस्पाल राणा यांच्यासोबत तिने सराव केला अन् पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. २२ वर्षांची मनु ही एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी स्वातंत्र्य भारतानंतरची ती पहिलीच खेळाडू ठरली. त्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. परंतु, मनू भाकरच्या आई-वडिलांनी तिला कांस्यपदक जिंकताना पाहिले नाही. याचे कारणही आश्चर्यकारक आहे.

भारतीय महिला नेमबाज मनु भाकरने दोन पदकं जिंकत 124 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. स्वतंत्र भारतात दोन पदकं जिंकणारी स्पर्धक ठरली आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत तिने दोन पदकं जिंकली आहेत. मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि मिक्स्ड प्रकारात पदकाची कमाई केली आहे.

दोन्ही ठिकाणी मनुच्या खात्यात कांस्य पदक पडले आहेत. आता मनु या स्पर्धेत पदकांची हॅटट्रीक करण्यासाठी उतरणार आहे. तिसरं पदक जिंकण्यात यश आलं तर अशी भारतीय ऑलिम्पिक इतिहासात महारेकॉर्ड होईल. हा विक्रम मोडीत काढणं कोणत्याही खेळाडूला शक्य होणं कठीण आहे.

भारतीय ऑलिम्पिक इतिहासात 1900 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून नॉर्मन प्रिचर्डने दोन रजत पदक जिंकले होते. त्यानंतर मनु भाकरने दोन पदकं जिंकत पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. आता 124 वर्षांचा हा विक्रम मोडीत काढण्याची संधी मनु भाकरकडे आहे. 3 ऑगस्टला मनु भाकर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तेव्हा तिच्याकडून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे.

काय म्हणाले मनूचे आई-वडील ?
मनूचे वडील रामकिशन भाकर आणि आई सुमेधा भाकर यांनी आपल्या मुलीला कांस्यपदक जिंकताना पाहिले नाही. कारण ही मनूच्या आई-वडिलांची युक्ती आहे. ते आपल्या मुलीची कोणतीही पदक स्पर्धा पाहत नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना मनूच्या कांस्यपदकाच्या विजयाची माहिती दिली.

मनू भाकरचे वडील रामकिशन यांनी आपल्या मुलीच्या दुसऱ्या पदक विजेत्यावर सांगितले की, मनूला देशाकडून इतके प्रेम मिळत आहे, याचा मला खूप आनंद आहे. याचं संपूर्ण श्रेय पत्नी सुमेधाला जातं, कारण तिने मनूच्या करिअरची काळजी घेतली असल्याचं ते म्हणाले. टोकियो ऑलिम्पिकमधील निराशेनंतर आपल्या मुलीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रशिक्षक जसपाल राणा यांचेही मनूच्या पालकांनी आभार मानले.