Manu-Neeraj : पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा संपल्यानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी हे दोघे लग्न करणार असल्याचा तर्क लावला. अशातच आता मनूची आई नीरजचा हात डोक्यावर ठेवत असल्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. यावरून नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या व्हिडीओबाबत मनूच्या वडिलांनी मौन सोडले आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय ?
सदर व्हिडीओमध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात घेत त्यांच्या डोक्यावर ठेवला. तसेच बराच वेळ दोघांमध्ये चर्चाही झाल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओवरुन मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.
नेटकरी काय म्हणाले ?
सदर व्हिडीओवरुन नीरज चोप्राची आई मनू भाकरसोबत लग्नाची चर्चा करत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर मनू भाकरची आई जावयाच्या शोधात असून लग्नाची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. एका युजर्सने मग… ठरलं का?, लग्नाची सुपारी फोडायची का ?, असंही म्हटलं आहे.
मनू भाकरचे वडील काय म्हणाले ?
मनू अजून खूप लहान आहे, तिचे अद्याप लग्नाचे वय झाले नाही. आताच्या घडीला आम्ही त्याबद्दल कोणताही विचार करत नाही. याशिवाय पत्नी आणि नीरज चोप्राच्या व्हायरल व्हिडीओवर बोलताना राम किशन म्हणाले की, मनूची आई नीरजकडे आपल्या मुलाप्रमाणे पाहते.