Politics Maharashtra : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा नितीन घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवारांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही. दरम्यान, शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध केला असून घेतलेला निर्णय मागे, द्यावा अशी मागणी यावेळी कारकर्त्यानी केली. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? यावर चर्चा रंगू लागल्या असून अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत.
कोण आहेत ते नेते?
प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील,अजित पवार,सुप्रिया सुळे या नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.