---Advertisement---

एप्रिल मध्ये अनेक ग्रह राशी बदलणार; ‘या’ राशीच्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागणार

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३।वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल २०२३ मध्ये अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. या दरम्यान बुध ग्रह आणि ग्रहांचा गुरू मेष राशीत भ्रमण करतील.  दोन्ही ग्रहांच्या संयोगाने मेष राशीत भ्रमण होऊन गुरु चांडाळ योग निर्माण होईल. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग अत्यंत विनाशकारी मानला जातो. राहू आणि सूर्याच्या संयोगाने ग्रहण योग निर्माण होतो. हे दोन्ही योग एप्रिल महिन्यात अत्यंत धोकादायक ठरतील. त्यामुळे काही राशीच्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे तर कोणत्या आहे त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. या राशीच्या लोकांचे शत्रू तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.  अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या काळात तुम्ही विचारपूर्वक व्यवसायात गुंतवणूक करावी.

तूळ राशी
एप्रिल महिन्यात हा योग तूळ राशीच्या लोकांसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतो. तूळ राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याबाबत थोडे सावध राहणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर घरात त्रास होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग संमिश्र परिणाम देईल. शक्य असल्यास वादात पडणे टाळा. या योगामुळे तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment