---Advertisement---

तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण; सोयगावात मराठा प्रतिष्ठानकडून नागरिकांना दिलासा

---Advertisement---

सोयगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान पाटील गव्हांडे यांनी मान्यवरांच्या हस्ते ४२ गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या एक हजार व पाचशे लिटर्सच्या साठवण टाक्या मोफत वाटप करून दिलासा दिला.

शनिवारी दुपारी एक वाजता झालेल्या घोसला गावातील या कार्यक्रमात डॉ.रुपेश पाटील (दीपस्तंभ जळगाव) , ओमकार गिरी महाराज(मुरडेश्वर संस्थान) मुंबई सायबर सेलचे उपनिरीक्षक निवृत्ती बावसकर, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, संजय पाटील, मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान पाटील गव्हांडे,सरपंच गणेश माळी,प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे,तालुकाध्यक्ष विजय चौधरी,ग्रामपंचायत सदस्य सोमु तडवी,माजी सरपंच सुरेखा तायडे(गलवाडा) आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रस्तवविकात सोपान पाटील गव्हांडे यांनी समाजाचे देणे लागतो त्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश बाळगून हा उपक्रम राबविला असल्याने सांगितले.

डॉ.रुपेश पाटील यांनी खेडेगावात शांतता काय असते हे पहायचे असेल तर घोसला या पावन भूमीत या असे सांगून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले मुख्याध्यापक संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले दरम्यान तालुक्यातील ४२ गावांना मान्यवरांच्या हस्ते पाचशे टाक्या वाटप करण्यात आल्या ऐन पाणी टंचाईच्या छायेखाली असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे,तालुकाध्यक्ष विजय चौधरी, प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर गवळी,ज्ञानेश्वर युवरे,गणेश गवळी,अप्पा वाघ,गणेश तायडे,अमोल बोरसे,संदीप गव्हांडे,संदीप पाटील,समाधान गव्हांडे,चरण वाघ,आबा कोळी,एकनाथ गवळी,बंडू बावसकर, आदींनी पुढाकार घेतला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment