---Advertisement---
Maratha reservation : विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले ही आनंदाची बाब आहे. पण मराठा समजाणे जागृत राहावं. तोंडाला पाण पुसण्याचं काम चालू आहे, अशी सुचक प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलीय.
मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळालीय. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० आरक्षणाला मंजुरी देण्यात आलं. मंत्रिमंडळातील नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तर अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आंनदोत्सव साजरा केला जात आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सुचक प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी राज्यातील इतर प्रश्नांकडे लक्ष वेधलं.
राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेचा मराठा समाज आणि जाणकार विविध अर्थ काढत आहेत. राज्य सरकारने खरंच मराठा समाजाला फसवलं का असा प्रश्न केला जात आहे.
राज ठाकरे म्हणाले कि
आरक्षण हा केंद्रीय विषय आहे. सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद आहे. पण हा अधिकार आहे का? राज्य सरकारला याचा अधिकार आहे का? राज्यात एखाद्या जातीबद्दल, असं करण्याचा अधिकार आहे का? मला कळत नाही असं काय चाललय इतर मोठे विषय आहेत यांच्याकडे कुणाचं लक्षच नाही. लोकांच्या भेडसावणाऱ्या प्रश्न बाबत कोण बोलत नसल्याचं खतं त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
---Advertisement---