Maratha Reservation : भुजबळांच्या विरोधी भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत आहे. याला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यावरून राज्यातील सत्तेत एकत्रित असणाऱ्या नेत्यांमध्ये मतमत्तातरे दिसून येत आहेत. अशातच कोल्हापूर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार ?
 प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. वेगळे विचार असू शकतात, प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मी कोणालाही धक्का न लावता यातून मार्ग काढेन असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. अशातच घरात दोन भाऊ असतात त्यांच्यामध्ये देखील अनेक मतभेद असतात. घरातील सदस्य एकत्रित बसतात आणि त्यामध्ये काही समज गैरसमज असतील ते दूर करतात, असं अजित पवार म्हणालेत.