मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत आहे. दरम्यान, छगन भुजबळांनी सध्या आक्रमक पवित्रा घेत ‘आपल्याला सरकारमधून काढून टाकलं किंवा पक्षातून काढलं तरी आपण ओबीसींच्या बाजूचा लढा सुरुच ठेवणार’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अशातच “आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, हे मी स्पष्ट करतो. ओबीसी समाजाचे रक्षण आपल्याला करायचे आहे, याची जाणीव स्वत: मुख्यमंत्र्यांना आहे… जोपर्यंत भाजपचे सरकार आहे तोपर्यंत, आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.
ओबीसींना संरक्षण देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी स्वतः जाऊन आमच्या वरिष्ठांशी बोलेन, पण काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी भाजपची भूमिका आहे…” असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.