Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील म्हणाले आमची सगळी तयारी झाली आहे

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मराठा आंदोलक मुंबईमध्ये धडकणार असल्याची घोषणा केली आहे. १० लाख गाड्यांसह ३ कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये धडकणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही.. असा इशाराही त्यांनी दिलाय. “आमची सगळी तयारी झाली आहे, आम्ही सज्ज आहोत,आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले जरांगे पाटील?

“आम्ही शेतातली काम आटोपून मुंबईला येण्याचे नियोजन केले आहे. मुंबईतील आंदोलन हे सर्वात मोठे असेल. सर्व कामे आटोपून मुंबईत धडक द्यायची आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मुंबईतील लोक आमचीच आहेत, मुंबईतला प्रत्येक माणूस आमचं स्वागत करेल अशी अपेक्षा. त्यांनी आमचे स्वागत करावे…” असे खास आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सरकारला इशारा!

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “सरकारकडून आमची फसवणूक करण्यात आली. आतपर्यंत गेलेल्या बळीला पूर्णतः सरकार जबाबदार आहे, यापुढे सरकारला एक तासही वेळ देणार नाही. लवकर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मराठे तुटून पडल्याशिवाय राहणार नाही…” असे जरांगे पाटील म्हणाले.