जळगाव : दुचाकीवरून गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला चोपडा पोलीस अटक केली आहे. कालूसिंग गोराशा बरेला (वय २६, रा. महादेव, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल २० लाख ३० हजार रुपयांचा गांजा तप्त करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार चुंचाळे रोडवर पोलीस पथकाने सापळा रचला. या सापळ्यात एका संशयित दुचाकीस्वाराला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे १० किलो ६०० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा आढळून आला.
पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कालूसिंग गोराशा बरेला असे नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडून तब्बल २० लाख ३० हजार रुपयांचा गांजा तप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जगावे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील यांनी ही कारवाई केली.