---Advertisement---
Marijuana trafficking: चोपडा-शिरपूर रस्त्यावरील भाटपुरा चौकीजवळ दुचाकीवरून गांजाची तस्करी करताना पुरुषासह महिलेला पोलिसांनी अटक करीत, त्यांच्याकडून गांजासह सुमारे दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीवरून चोपड्याकडून शिरपूरकडे गांजाचे वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती थाळनेर येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळाली. त्याअनुषंगाने सहाय्यक निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार, वजन-काटाधारक, छायाचित्रकारासह पोलीस पथकाने शिरपूर- चोपडा रस्त्यावरील भाटपुरा चौकीजवळ सापळा रचून गांजाची तस्करी उघडकीस आणली. पोलिसांनी पुरुषासह महिलेकडून सुमारे २४.१९० किलो गांजा व दुचाकीसह सुमारे दोन लाख २९ हजार ३३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांची विचारपूस केली असता, इमरान लियाकत अली सय्यद (वय ३९, रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड) व समीना शेख अफसर शेख (वय ३४, रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना) अशी नावे सांगितली. त्यांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडून एक लाख ६९ हजार ३३० रुपयांचा २४.१९० किलो गांजा आणि ६० हजारांची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या म ार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील, उपनिरीक्षक दिलीप पवार, उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, आकाश साळुंखे, ललिता पाटील, मुकेश पवार, रावसाहेब पाटील, भाऊसाहेब मायचे, दिलीप मोरे, गृहरक्षक दलाचे संजय साबळे व पोलीसमित्र मनोज कोळी आदींनी ही कारवाई केली.
---Advertisement---