‘ऐकत नव्हता मुरारी’, शेवटी विवाहित प्रेयसीने झोपेतच… नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

 

Murari and Pooja case : प्रियकर मुरारी ऐकत नसल्याने विवाहित प्रेयसी पूजाने तो झोपेत असताना त्याच्यासोबत भयानक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी विवाहित प्रेयसी पूजाला अटक केली आहे. दरम्यान, मुरारीच्या भावाने विवाहित प्रेयसी पूजावर गंभीर आरोप केले असून, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

पोलीस सूत्रानुसार, पूजा आधीच विवाहित होती. ती तिच्या पतीपासून वेगळी होती. गेल्या पाच वर्षांपासून ती मुरारीसोबत प्रेमसंबंधात होती. मुरारी हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो पूजासोबत भाड्याच्या घरात राहत होता.

दरम्यान, तो चार वर्षांपासून तिला लग्नाचे आश्वासन देत होता. मात्र, तो लग्न करत नसल्याने दोघांमध्ये वाद होत होता. या रागातून पूजाने मुरारी हा झोपेत असतानाच त्याच्या डोक्यात दगड टाकला आणि त्याला ठार केले. यानंतर तिनेच फोन करून घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पूजा ही मुरारीच्या मृतदेहाजवळ बसलेली होती. पोलिसांनी तिला अटक केली असून, याबाबत चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, मुरारीच्या भावाचा आरोप आहे की पूजा त्याच्या भावाची जमीन आणि पैसे हडप करू इच्छित होती. मुरारीने त्याच्या बहिणीकडून एक लाख रुपये उधार घेतले होते आणि जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती. पूजाला तिच्या नावावर मालमत्ता हवी होती, परंतु मुरारीने नकार दिला.

बिहारच्या पाटणामध्ये ही घटना घडली असून, या घटनेमुळे एक खळबळजनक उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी पूजाला अटक केली आहे. याबात तपास सुरू केल्याची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---