---Advertisement---

पतीचे अनैतिक संबंध; २५ वर्षीय विवाहितेने संपविले जीवन, चाळीसगावातील घटना

---Advertisement---

चाळीसगाव : सासरच्या छळाला कंटाळून तसेच पतीच्या अनैतिक विवाहबाह्य संबंधामुळे २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगावात समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

पूजा राहुल आल्हाट (२५, धुळे रोड पोस्टल कॉलनी, चाळीसगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पती व तलाठी राहुल कचरू आल्हाट, सासू मायाबाई कचरू आल्हाट, दीर तेजस कचरु आल्हाट (सर्व रा. चाळीसगाव) व निकीता जाधव (सर्व रा. चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव व्यतिरीक्त पती, सासु व दीराल अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, मयत विवाहितेची आई कस्तुराबाई धर्मा राखपसरे (४०, महादेव नगर, मालेगाव कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी पूजा आल्हाट हिचा सासरच्या मंडळींनी छळ केला तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.

पतीचे अनैतिक संबंध
संशयीत राहुल आल्हाट याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने या प्रकाराला पीडीता कंटाळली व तिने रविवार, ९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी आत्महत्या केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment