---Advertisement---
धुळे : पतीच्या जाचाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२४ मे ) रोजी सोनगीर गावात घडली. अनिता राहुल मोरे (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिसात पती राहुल मोरे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मृत विवाहितेचे वडील मोहन जयराम भोई (वय ५०, रा. सारंगखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २३ रोजी सायंकाळी अनिता हिने तिच्या आईच्या मोबाइलवर फोन करीत, पती राहुल मंगा मोरे (वय ३३) हा सतत शिवीगाळ व मारहाण करत असतो, तसेच पतीपासून माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.
---Advertisement---
यानंतर, २४ रोजी पहाटे तीनच्या सुमारास अनिता हिने पतीच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी सोनगीर पोलिसात पती राहुल मोरे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नात नाचण्याच्या वादातून मारहाण
नंदुरबार : नाचण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत तीनजण जखमी झाल्याची घटना खातगाव (ता. नवापूर) येथे शनिवारी घडली. याबाबत विसरवाडी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खातगाव (ता. नवापूर) येथे दिलीप आलू वसावे यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिनेश विक्रम वसावे व आनंद अरविंद वसावे यांच्यात नाचण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.
यात विनेश विक्रम वसावे, लक्ष्मी अशोक वळवी व चंद्रदेव नामदेव गावित हे जखमी झाले. याबाबत विनेश वसावे याने फिर्याद दिल्याने आनंद वसावे, दानियल वसावे, सत्यजीत वसावे व भानुदास वसावे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.