---Advertisement---

घरात कुणी नसताना विवाहितेने प्राशन केले औषध, बेशुध्दवस्थेत रुग्णालयात दाखले केले, पण… धुळ्यातील घटना

---Advertisement---

धुळे: तालुक्यातील रानमळा येथील २१ वर्षीय विवाहिता मनीषा योगेश कुलकर्णी यांनी दि. २७ रोजी राहत्या घरात काहीतरी विषारी औषध प्राशन केले. बेशुध्दवस्थेत घरच्यांनी उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी मोहाडी नगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन वाघ करीत आहेत.

देवपूर येथून दुचाकी चोरीला


धुळे : देवपूसतीन रामकृष्ण नगरातील प्लॉट नं. ६६ मध्ये राहणान्या पक अशोक बाविस्कर (वय ३७) यांच्या राहत्या घरासमोरून ३० हजार रूपये किमतीची एमएच-१८ एपम-६८४७क्रमांकाची दुचाकी दि. २३ ते २४ रोजी दरम्यान चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार साळवे करीत आहेत.

वाहन चालकाची दुचाकी चोरीस


धुळे शहरातील निर्णय लेंब समोरून फिर्यादी आकाश लक्ष्मण उसिरे (वय ३२ स. अवधान ता.जि. धुळे) यांचे मानाविधी एमएच-१८ सोबी-०५५३ क्रमांकाची ४० हजार रूपये किमतीची दुचाकी दि.२२ रोजी रात्री साडे दहाच्या सुमाराम चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पुकळे करीत आहेत.

डोक्याला दुखापत, तरूणाचा मृत्यू


धुळे : भांडणात खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याने डिपसिंग कन्हैय्यालाल पावरा (नय३५ रा. हिगांव ता. शिरपूर) याला दि. २७ रोजी सायंकाळी शिरपुर कॉटेज हॉस्पिटलात दाखल केले असला डॉ. ऋषीकेश वाघ यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक मिलिंद पवार करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment