देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, आणखी एका विवाहित महिलेवर हॉटेलमध्ये दारू पाजून सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने एका बड्या नेत्यावर आणि गायकावर अत्याचाराचे गंभीर आरोप केलेय. दरम्यान, या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर त्या प्रकरणाचा उलगडा
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ती तिच्या बॉस आणि महिला मित्रासोबत एका हॉटेलमध्ये राहात होती. 3 जुलै 2023 रोजी तिने एका नेता आणि एका गायकाची भेट घेतली, ज्यांनी तिला सरकारी नोकरी देण्याचे आणि अल्बममध्ये अभिनयाची संधी देण्याचे आमिष दाखवले.
पीडितेने या दोघांच्या प्रभावाखाली येत त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी तिला दारू पिण्यास भाग पाडले. पीडितेने नकार दिला असता तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्या दोघांनी त्याच गैरकृत्याचा व्हिडिओही बनवून पीडितेला धमकी देत, गप्प राहण्यास सांगितले.
त्या घटनेनंतर दोन महिन्यांनी पीडितेला घरामध्ये बोलावून खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेने त्रासाला कंटाळून 13 डिसेंबर 2024 रोजी कसौली (हरियाणा) येथील पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीरतेने दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आता या प्रकरणात कोणत्या नेत्याचे आणि गायकाचे नाव समोर येत हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.