जळगाव : दोन वर्षीय बालिकेसह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली. पतीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, तालुक्यातील विवाहिता ही कोणास काही न सांगता तिच्या दोन वर्षीय बालिकेसह ३ मार्चला दुपारी दीडला राहत्या घरातून निघून गेली आहे. पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु आढळली नाही म्हणून पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.
बेपत्ता विवाहितेचे वय २६ वर्षे आहे. उंची ५ फुट २ इंच, शरीर बांधा मजबूत, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे मोठे, केस काळे लांब, अंगात साडी गुलाबी रंगाची तसेच डाव्या हाताच्या अंगठा व पहिले बोट ५ आणि असे गोंधलेले आहे. बालिकेचा रंग गोरा, डोक्यावर काळे बारीक केस, डोळे मोठे, नाक सरळ, उंची अंदाजे २.५ फुट, अंगात फिकट गुलाबी फ्रॉक, पायात लाल रंगाचे बुट असे वर्णन आहे.
या वर्णनाची बेपत्ता विवाहिता आढळून पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हरिष अहिरे करीत आहे.