---Advertisement---

Nagpur Murder News : दारू पाजली अन् केला जबरदस्तीचा प्रयत्न; नकार दिल्याने… नागपुरात अमानवीय कृत्य

---Advertisement---

नागपूर : नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित प्रेयसीचा निर्घृण खून केल्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहित गणेश टेकाम (वय २५, रा. कान्हादेवी, पारशिवनी, सध्या रा. कापसी, भंडारा रोड) असे आरोपीचे आहे.

पोलीस तपासानुसार, रोहित हा कापसीतील उमिया धाम परिसरात मिस्त्रीचे काम करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याची ओळख टीनाशी (नाव बदलले आहे ) झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली, त्यानंतर रोहितने तिला दारूच्या आहारी लावले. गुरुवारी दुपारी तो टीनाला भेटायला तिच्या घरी गेला. त्यावेळी तिचा पती ढाब्यावर, तर मुलगी शाळेत गेली होती.

हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ

दरम्यान, रोहितने टीनाला दारू पाजली आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला विरोध केला. संतप्त झालेल्या रोहितने तिचे डोके टेबलावर आपटले. त्यामुळे तिच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला आणि ती बेशुद्ध झाली. घाबरलेल्या रोहितने तेथून पलायन केले.

थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आले की, त्याचा मोबाइल टीनाच्या घरातच राहिला आहे. त्यामुळे तो पुन्हा तिच्या घरी गेला. त्या वेळी टीना शुद्धीवर आली होती आणि रडत होती. त्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार केला. त्यामुळे संतापलेल्या रोहितने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला आणि नंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केला.

सायंकाळी ५.३० वाजता टीनाची मुलगी शाळेतून घरी आली. आई बेशुद्धावस्थेत दिसल्याने तिने वडिलांना कळवले. पती घरी आल्यावर टीनाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा मृत्यू झाला. नंतर शेजाऱ्यांना बोलावून पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचलेल्या हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला. टीनाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन जणांना ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर रोहितने खून आणि मृतदेहावर अत्याचार केल्याची कबुली दिली.

पोलिस कोठडी सुनावली

हुडकेश्वर पोलिसांनी रोहितविरुद्ध खून आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले असून, पोलिस तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment