---Advertisement---
धुळे : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंधातून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सुरत येथील एका विवाहितेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून धुळ्यातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन तरुणाने विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ११ जुलै ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तरुणाने वारंवार तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले आणि तिचे शोषण केले. तरुणाने विवाहितेचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील काढले.
त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेला शिवीगाळ केली. याशिवाय, या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकीही त्याने दिली. अखेर पीडितेने धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत राहुल सुखराज कोळी रा.जापी ता. धुळे, समाधान अशोक पाटील रा. बाळापूर ता. धुळे, कान्हा किरण मोरे रा. बाळापूर, ता. या आरोपीचा समावेश आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.