मारुतीच्या ९ हजार गाड्या परत मागविल्या, हे आहे कारण

नवी दिल्ली : मारुती सुझुकी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय वाहन कंपनी म्हणून ओळखली जाते. विक्रीमध्ये मारुती दरवर्षी नवनवे विक्रम करत असते. मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी बातमी समोर आली आहे. कारण कंपनीने ९ हजारांहून अधिक वाहने परत मागवली आहेत. या वाहनांत सीट बेल्टमध्ये खराबी आढळून आल्यानंतर मारुती सुझुकीने ९१२५ वाहने परत मागवली आहेत.

जी ५ मॉडेल्स परत मागवली जाणार आहेत, त्यांत सियाझ, ब्रेझा, एर्टिगा, एक्सएल६ और ग्रैंड विटारा यांचा समावेश आहे.  मारुति सुजुकी इंडिया ने मॉडल सियाज, ब्रेजा, एर्टिगा, एक्सएल ६ आणि ग्रँड विटाराच्या ९,१२५ युनिट्स परत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रंट रो सीट बेल्टच्या एका भागातील संभाव्य तृती दुरुस्त केली जाईल. गेल्या २ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान तयार करण्यात आलेल्याकार परत मागवली जातील.

कंपनीने म्हटले आहे, की कारच्या पुढील रोमध्ये सीट बेल्टच्या शोल्डर हाइट अ‍ॅडजस्टमेन्ट असेम्बलीच्या भागात खराबी असल्याचा अंदाज आहे. यामुळे क्वचित प्रसंगी, सीट बेल्ट ओपनही होऊ शकतो. तसेच, कंपनीने तपासणीसाठी वाहने परत बोलावणे आणि खराब भाग मोफत बदलन्याचा निर्णय करण्यात आला आहे. वाहन मालकांना कंपनीच्या वर्कशॉपकडून कळविले जात आहे.