---Advertisement---

मुंबईत मालिकेच्या सेटला भीषण आग; अनेक कलाकार अडकले

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। मुंबईतील गोरेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. फिल्मसिटीतील एका टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही कलाकार या आगीत आडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीत चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं. ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेच्या सेटवर ही आग लागल्याची माहिती आहे. संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली. यादरम्यान येथे वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमुळे टीव्ही मालिकेच्या लाकडी सेटला आग लागली. या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अद्यापही काही कलाकार या आगीत अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment